corona.jpg
corona.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

अरे बापरे...तपासणी करणाऱ्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर ग्रामस्थ थुंकले...

दिनेश पिसाट

अलिबाग : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे.  बुधवारी (ता.२२)  तब्बल 10,576 रुग्णांची आतापर्यंतची सर्वात मोठी नोंद झाली.  कोरोनावर नियत्रंण मिळविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करीत आहे. पण काही ठिकाणी नागरिक तपासणी करण्यास विरोध करीत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशाच एक प्रकार आज अलिबाग तालुक्यात घडला. तपासणीस गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर थुंकण्यापर्यंत हा प्रकार गेल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

अलिबाग तालुक्यातील बोडणी गावात आतापर्यंत 70 ग्रामस्थ कोरोना प़ॉजिटीव्ह झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा पुढे सरसावली पण स्थानिक ग्रामस्थ  तपासणी करण्यास प्रखर विरोध करीत आहेत. हा विरोध तपासणी करणाऱ्या आरोग्य  कर्मचाऱ्यांवर थुंकण्यापर्यंत गेल्याने इथल्या आरोग्याची समस्या वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. याला विरोध करणाऱ्यामध्ये  महिलांची संख्या अधिक होती. 

अलिबागचे तहसीलदार आणि पोलीस या ठिकाणी लोकांना समजवत आहेत. पण कोणीही ऐकण्यास तयार नाही. आम्हाला कुणाला कोरोना झाला नाही, तुम्ही आमची तपासणी करू नका सगळे येथून चालते व्हा.. असं बोडणी गावातातील महिला, नागरिक संप्ताप व्यक्त करून बोलत आहेत. सध्या बोडणी गावातील वातावरण तापलेले असून जिल्हा प्रशासनाची  डोकेदुखीत वाढ झाली आहे

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून आज तब्बल 10,576 रुग्णांची आतापर्यंतची सर्वात मोठी नोंद झाली. यासोबतच राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,37,607 झाली आहे. आज 280 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 12,556 वर पोहोचला आहे. राज्यात सध्या 1,36,980 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी  5552 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

राज्यात आतापर्यंत 1,87,769 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.62 टक्के एवढे आहे. आज राज्यात एकूण 280 मृत्यूंची नोंद झाली. त्यापैकी मुंबई 58, ठाणे जिल्हा 117, पुणे मंडळ 71, नाशिक 23, औरंगाबाद मंडळ 4, कोल्हापूर 23, लातूर मंडळ 7, अकोला मंडळ 4, नागपूर 3 आणि इतर राज्यातील एका मृत्यूचा यात समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 3.72 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 16,87,213 नमुन्यांपैकी 3,37,607 (20 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,58,121 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 44,975 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT